Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

दुहेरी खून आणि मोका च्या गुन्ह्यातून 2 आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे:जेजुरी पोलीस स्टेशन च्या हदद्दीतील रिसे गावाच्या शीवारातील अडसळू याांच्या शेतात दि 21/01/2017 रोजी दोन अनोळखी मृतदेह पडलेली आढळून आली होती , त्या नांतर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव याांच्या फिर्यादी नुसार भा. द.वी.चे कलम 302, 201 नुसार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानांतर तपासात पुढे पोलिसांनी अंकुश भोंडवे व संतोष कुमावत या आरोपीना अटक केली होती,

येरवडा जेल मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात बंदी असताना जेल मध्ये झालेल्या जुन्या भाांडणाच्या कारणावरून दि 21/01/2017 रोजी आरोपी संतोष कुमावत आणि अंकुश भोंडवे यांनी अनिल शिवरकर व संतोष उर्फ मनोज जगताप याांचा ब्लेड व दगडाच्या सह्याने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने दोन्ही प्रेते जेजुरी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रीसे गावच्या शिवारात अडसूळ यांच्या शेतात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली होती , त्या नंतर दोन्ही आरोपी याांचे विरोधात महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायद्यअंतर्गत (मोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षा तर्फे साक्षीदार तपासण्यात आले परतू सदर आरोपी याांच्या विरुद्ध कुठलाही सबळ पुरावा न मिळून आल्याने दोन्ही आरोपीना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश विशेष मोका न्यायाधिष जिल्हा व सत्र न्यायालय मा. अ. न. सिरसिकर यांनी दिले अशी माहिती आरोपीचे वकील ॲड.नितिन भालेराव याांनी दिली , सरकार पक्षा तर्फे ॲड पठारे व आरोपी तर्फ़े ॲड.विपुल दुषिंग व ॲड. नितिन भालेराव यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading