Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळून येत आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ कमी  होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 334नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 57 हजार 517 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 43 हजार 932 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 04 हजार 252 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 191 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3818स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading