Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आम्ही आमचे काम करतो ज्याना गर्दी करायची ते करणार सुप्रिया सुळे यांचा किरीट सोमय्या यांना टोला


पुणे : मागच्या आठवड्यात किरीट सोमय्या यांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीमुळे एक दिवस पुणे महानगरपालिकेत त्या दिवशी सामान्य जनतेचे खूप हाल झाले .त्यामुळे विविध पक्षानी विरोध त्या दिवशी दशवला त्यावर आम्ही आमचे काम करतो ज्याना गर्दी करायची ते करणार असा टोला किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी हाणला.
सुप्रिया सुळे हे आज पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावांविषयी चर्चा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी विविध मुद्यावर संवाद साधला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी
समाविष्ट गावातील मालमत्ता कर, खडकवासला विधान सभा मतदार संघातील पाणी प्रश्न आदी विषयांवर आयुक्तांशी चर्चा झाली. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कर्नाटकात मागच्या आठवड्यात मुस्लिम समाजाच्या मुलीवर कर्नाटक सरकारने हिजाब घालायला बंदी घातली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रातली उमटले होते . त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,महिलांनी कुठले कपडे घालावेत हे तुम्ही कोण सांगणार ? असा सवाल त्यांनी कर्नाटक सरकार पुढे उपस्थित केला.
किरीट सोमय्या हे रोज नवीन कुठला तरी घोटाळा काढून आरोप करत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,सोमय्या रोज नवीन आरोप करत असतात.पहिला समजेपर्यंत दुसरा आरोप करतात. पहिला पण लक्षात राहतं नाही.सत्तेत असतात आमचं काम असतं काम करणे आणि विरोधात असतात त्यांचं काम असतं आरोप करणे. आम्ही काम करत राहणार. असा टोला सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांना हाणला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजपचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .असे म्हणत आहेत त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,भाजपचे कोण नेते प्रवेश करणार आहेत हे संजय राऊत यानाच विचारा. आज मुंबईत काँग्रेस व भाजपमध्ये समाजासमोर हाय व्होल्टेज ड्रामा घडला त्यामुळे मुंबईतील काही ठिकाणचे वातावरण हे. बिघडलेले होते. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,मुंबई पोलिसांनी आंदोलन खूप व्यवस्थित हाताळल . मी त्यांचं कौतुक करते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading