Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिका निवडणूक : प्रारुप प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस 

पुणे: पुणे महापालिकेच्या  आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या  प्रारूप प्रभाग रचनेवर  आज अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल २ हजार ८०४ अर्जांतून ३ हजार ५९६ नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवल्या आहेत.
या हरकती आणि सूचनांवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून. यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम  यांची प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे. वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधीक तर शिवाजीनगर – घोलेरोडला   सर्वात कमी हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत १७३ जागांसाठी प्रभाग पद्धतीने निवडणुक होणार आहे. राज्य शासनाच्या  आदेशानुसार त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणुक होणार असून ५७ त्रिसदस्यीय व एक द्विसदस्यीय प्रभाग असणार आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये अगदी सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला आहे. आपल्याला अनुरूप प्रभागासाठी प्रशासकीय यंत्रणेवर राजकिय दबाव टाकण्यात आल्याचे आरोप झाले. यानंतरही ६ डिसेंबरला महापालिकेने राज्य निवडणुक आयोगाला सादर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये निवडणुक आयोगाने त्यांच्या स्तरावर बदल सुचविले व प्रत्यक्षात केले देखिल आहेत.
यानंतरही हरकती आणि सूचनांसाठी देण्यात आलेल्या कालावधीत ३ हजार ५९६ नागरिकांनी २ हजार ८०४ हरकती व सूचना नोंदविल्या आहेत.
सर्वाधीक हरकती व सूचना वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयाकडे (१०३४) आल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडे (१२) आल्या आहेत. निवडणुक कार्यालयाकडेही १ हजार २९५ हरकती व सूचना गोळा झाल्या असून त्या संबधित क्षेत्रिय कार्यालयांकडे वर्ग करण्यात येतील. वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयापाठोपाठ धनकवडी- सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडे २८९ हरकती आल्या असून यापैकी २४६ हरकती या आज शेवटच्या दिवशी दाखल झाल्या आहेत.
कसबा- विश्रामबाग 253,औंध-बाणेर 35,भवानी पेठ23,बिबवेवाडी 68,ढोले पाटील रोड 113, रोड 113हडपसर – मुंढवा ८८,कोंढवा –येवलेवाडी   ५१,कोथरूड- बावधन 77,नगररोड- वडगावशेरी 
१५६,सिंहगड रोड 25,वारजे – कर्वेनगर ६२,येरवडा- कळस- धानोरी  15
क्षेत्रिय कार्यालयाकडे हरकती व सूचना आल्या आहेत. ३ हजार ५९६ हरकतींपैकी शेवटच्या दिवशीच तब्बल २ हजार ८०४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading