Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

२४ व्या ‘कलाश्री संगीत महोत्सव’चे आयोजन

पुणे : कलाश्री संगीत मंडळातर्फे २४ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान नवी सांगवी येथील निळू फुले सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा महोत्सव होणार आहे. या तीन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील कलाकारांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे.

१८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाला सुरुवात होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महापौर उषा ढोरे उपस्थित राहणार आहे. महोत्सवादरम्यान विविध पुरस्कार आणि कलाकारांचे सादरीकरण होणार आहेत. यंदाचा २४ वा कलाश्री पुरस्कार पं. केशव गिंडे यांना प्रदान केला जाणार असून स्व. शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ कलाश्री युवा पुरस्कार भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे विराज जोशी यांना देण्यात येणार असल्याची माहिती कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांनी दिली.

१८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर नृत्यांगणा व अभिनेत्री शर्वरी जमेनीस या कथक नृत्य सादर करतील. १९ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्षद अली खान यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर पं. अतुलकुमार उपाध्याय यांचे व्हायोलीन वादन होईल. २० फेब्रुवारी रोजी विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन होईल व कार्यक्रमाची सांगता गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. यावेळी कलाकारांना साथसंगत मुकेश जाधव, निखिल फाटक, प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, नंदकिशोर ढोरे, विभव खांडोळकर, प्रभाकर पांडव, तन्मय देवचक्के, अभिनय रवांदे, गंगाधर शिंदे हे साथसंगत करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading