fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

पुणे : अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षे नंतर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आवारात साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओमध्ये या सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा बनवण्यत आला आहे. या पुतळ्याची उंची 12 फूट आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.

कार्यक्रमास गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळजी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ त्यांचा पुतळा कुठं बसवायचा यावरून समितीमध्ये मतभेद होते.  मात्र विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या परिसरातच हा पूर्णआकृती पुतळा बसवण्याचे निश्चित झाले आहे.  या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा प्रभाव अधिक वाढल्याने सदरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading