Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र यावं – जयंत पाटील

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकीत आघाडी होणार का युती होणार अजूनही प्रश्न प्रलंबित आहे. काही पक्षाने जर आघाडी व युती झाली नाही तर स्वबळाचा नारा दिला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावर काँग्रेस, शिव सेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी माझी भूमिका आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकाराना दिली.

जयंत पाटील यांनी आज विविध मुद्यांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी होणार अजूनही प्रलंबित प्रश्न आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले, ओबीसी आरक्षण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. असे जयंत पाटील म्हणाले.
कर्नाटकमध्ये 2 दिवसापूर्वी मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातली. त्यामुळे महाराष्ट्रात हे पण वातावरण तापत आहे .त्यावर जयंत पाटील म्हणाले,भारतीय घटनेने अधिकार दिला आहे व्यक्ती स्वंतत्र हिरवून नाही घेऊ शकत.काही ठिकाणी जे चालू आहे तिथे वेगळी भूमिका घेऊन मुद्दाम हा विषय तैयार करणे हा प्रयत्न आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

किरीट सोमय्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर ज्यांनी हल्ला केला यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत .असा आरोप काही जन करत आहे. त्यावर पाटील म्हणाले,पोलिस जी परिस्थिती आहे त्यानुसार कलम लावतात. किरीट सोमय्या यांनी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज भेटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर हल्ला केला. असा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले,मुख्यमंत्री त्या प्रवृत्ती चे आहेत असं अजिबात नाही.त्याला महत्व देणं योग्य नाही. असे जयंत पाटील म्हणाले.

 चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार हेलिकॉप्टर मध्ये सारखी फिरत असतात अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. त्यावर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर पाटील म्हणाले ,अजित पवारांच्या हेलिकॉप्टर मध्ये बसले होते का दादा काय करतात ते बघायला .ते विरोधी पक्षाचे नेते असल्याने अस बोलावं लागतं .ते काहीही बोलतात. असे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading