Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

PMPML : अटल बस सेवेअंतर्गत मांजरी बु. ते मुंढवा चौक नवीन बसमार्ग सुरू

पुणे :  पीएमपीएमएल कडून आज दिनांक ०८/०२/२०२२ पासून अटल बस सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक एच १२ मांजरी बु. ते मुंढवा चौक/महात्मा फुले चौक हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. मांजरी बु. ते मुंढवा चौक/महात्मा फुले चौक फक्त ५ रुपये तिकिटदर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी, पुणे शहर भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. संदीप लोणकर यांनी या बसेसेवेसाठी पाठपुरावा केला.
याप्रसंगी पुणे शहर भाजप उपाध्यक्ष भूषण तुपे,  संदिप ओव्हाळ, अमित घुले, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक एच १२ मांजरी बु. ते मुंढवा चौक/महात्मा फुले चौक या बससेवेचा मार्ग मांजरी, माळवाडी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, घावटेनगर, घुलेवस्ती, म्हसोबा मंदिर, बालाजीनगर कॉर्नर, इंगळेनगर, लोणकर वस्ती, गणेशनगरी, ओम हॉस्पिटल, केशवनगर चौक, बधे वस्ती, मुंढवा चौक असा आहे. सध्या या बसमार्गावर एका बसद्वारे साधारणपणे दर ३० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. दिवसभरात एकूण २८ फेऱ्या होणार आहेत. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील.
मुंढवा चौक ते मांजरी पहिली बस सकाळी ६.१० वा. शेवटची बस रात्री ९.२५ वा. आहे. तसेच मांजरी ते मुंढवा चौक पहिली बस सकाळी ६.४० वा. तर शेवटची बस रात्री ९.५५ वा. आहे.
याप्रसंगी बोलताना संदिप लोणकर म्हणाले,”मांजरी व मुंढवा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची या बससेवेची मागणी होती. नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा करून ही बससेवा पीएमपीएमएल च्या माध्यमातून सुरू होत आहे. ही बससेवा या भागातील लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.”
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले,”सर्वसामान्यांसाठी किफायतशीर असणारी अटल बससेवा दिनांक २५/१०/२०२० पासून सुरू झाली. अटल बससेवा योजनेच्या माध्यमातून ५ रुपयात ५ किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो. या बससेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.”
संदिप दळवी व  भूषण तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. शैलेंद्र बेल्हेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading