Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात  964 नवीन कोरोना रुग्ण

पुणे: शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख एक हजाराच्या खाली आला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2075रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6लाख53हजार 256इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6लाख31 हजार 997इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 5पुणे महापालिका हद्दीबाहेरील3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9309जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या
11050रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 200रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5048स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading