महामाता मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पुणे : आज (दि. ७) महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोरगरिबांना मदत करणारे, ताडीवाला रोड भागातील सामाजिक कार्यकर्ते सावली सोशल फाऊंडेशन संस्थापक, अध्यक्ष अमित मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल क्रीडा प्रतिष्ठान चे संस्थापक राष्ट्रीय मुष्टियोद्धा बंडू गायकवाड, एकियान फाऊंडेशन चे अध्यक्ष भारत जगताप या दोघांच्या हस्ते अमित मोहिते यांना भारतीय संविधानाची प्रत व पंचशिल शाल देण्यात आली.
त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, रिपब्लिकन सेनेचे महा.प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे, काँग्रेस नेते राहुल तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर सरचिटणीस नितीन रोकडे, पंचशिल सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम कांबळे, प्रीतम भोसले, समता सैनिक दलाचे मेजर रामचंद्र वांजरे व इतर राजकीय/सामाजिक/शैक्षणिक/व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य संजय शिंदे यांनी केले
