योहान पुनावाला यांचा बिझनेस लीडर ऑफ दि इयर ने गौरव
पुणे : ऊषा काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ग्रॅव्हिटस फाऊन्डेशन द्वारा देण्यात येणार्या उर्जा ॲवॉर्ड्स २०२२ अंतर्गत पुनावाला ग्रुप ऑफ कंपनीज चे चेअरमन आणि संचालक योहान पुनावाला यांचा बिझनेस लीडर ऑफ दी इयर पुरस्काराने गौरव करण्यात आला. उर्जा ॲवॉर्ड्स हे मनोरंजन, खेळ, व्यवसाय, सामाजिक कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
हा पुरस्कार स्विकारल्या नंतर बोलतांना पुनावाला म्हणाले “ हा प्रतिथयश पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार म्हणजे आमच्या कंपन्यांनी विविध व्यवसायांवर जसे इंजिनियरींग, फायनान्स, निर्यात, रिअल इस्टेट, गुंतवणूक आणि हॉर्स ब्रीडिंग मध्ये केलेल्या कार्याचा गौरव आहे. आम्ही नेहमीच आमच्या सीमारेषा रूंदावत प्रत्येक आव्हानाचे संधी रूपांतर करून आमचे व्यावसायिक लक्ष्य पूर्ण करण्यावर भर दिला आहे. आम्ही अनेक सामाजिक कार्यात सहभागी आहोत आणि ही परंपरा कायम राखत आमचा सभोवताल चांगले स्थान बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. मला हे नमूद करतांना आनंद होतो की आम्ही वाढ नोंदवून नफा कमवत असतांनाच त्यातील काही भाग हा समाजाला देत असतो. कारण समाजामुळेच आम्ही आमचे जीवन जगत आहोत. मी श्रीमती ऊर्जा काकडे आणि ग्राव्हिटस फाऊन्डेशन चे आभार मानतो. माझे कार्य, माझा परिवार आणि आमची संपूर्ण टिम यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले असे मी मानतो.”
या कार्यकमात योहान पुनावाला यांच्या सह अनेक प्रतिथयश व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला, यामध्ये फरहा खान (भारतीय चित्रपट दिग्दर्शिका), केदार जाधव (भारतीय क्रिकेटपटू), रिंकू राजगुरू (मराठी कलाकार), डॉ. विद्या येरवडेकर (सिम्बॉयसिस सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर), डॉ. ऊर्वी जंगम (ॲस्थिसिस फाऊन्डेशन फॉर व्हिज्युअल इम्पेअर्ड च्या सह संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका), डॉ. अमिता फडणिस, अक्षय बर्दापुरकर आणि श्री पोपटराव पवार यांचा समावेश आहे.
उर्जा ॲवॉर्ड्स च्या पाचव्या पर्वातील पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित मान्यवरांमध्ये श्रीमती अमृता फडणवीस, श्रीमती. शर्मिला ठाकरे, श्रीमती मेधा कुलकर्णी, श्रीमती रुपाली चाकणकर यांच्यासह समाजातील अन्य प्रतिष्ठितांचा समोवश होता.
