Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

भाजप चे अजय सावंत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे:पुण्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं नसलं तरी राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे. वडगाव शेरीतील भाजप नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे तब्बल 25 नगरसेवक राष्ट्रवादीत घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. वडगाव शेरीनंतर चाकण येथील तीन नगरसेवकांनीदेखील भाजपचा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपला मोठा धक्का बसला आहे अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading