fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

येत्या सहा महिन्यात पाच लाख घरापर्यंत पाईप गॅस लाईन – खासदार गिरीश बापट


पुणे : एम एन जी एल च्या वतीने शहरामध्ये विनाखोदाई घरगुती गॅस च्या पाईपलाईन चे काम सध्या चालू आहे ते आता अंतिम टप्प्यात आले आहे ह्या कामाची तसेच ह्या कामासाठी विशेष मागविण्यात आलेल्या यंत्राची पाहणी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी एम एन जी एल च्या अधिकाऱ्यांच्या व पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या समवेत केली.

या वेळी या कामासाठी horizontal directional ड्रील्लिंग मशीन HDD हे यंत्र आणण्यात आले आहे ह्या द्वारे रस्त्यावर कुठल्याही प्रकार ची खोदाई न करता ह्या मशीन द्वारे तीन मिटर खोल खड्डा करून त्याद्वारे सुमारे 300 मिटर लांब पर्यंत लाईन टाकता येते आता पर्यंत पू इ शहरात एकूण ४२३०५८घरापर्यंत ही सुविधा देण्यात आली आहे
या बाबत माहिती देताना खासदार बापट यांनी एम एन जी एल ने प्रस्ताव दिल्यावर आपण पाठपुरावा करून विविध विभागांच्या जवळ पास ३५०परवानग्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या ५८पैकी ५५परवानगी मिळवून हे काम पूर्णवत्वास नेण्यासाठी प्रयनशील असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले आगामी काळात ५लाख हुन अधिक घरात ही सुविधा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला
या वेळी एम जी एन एल चे संचालक राजेश पांडे ,महापालिका उपयुक्त कुणाल खेमणार पुणे शहर भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे,संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर ,अर्जुन खानापुरे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading