Sunday, July 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

शिवसेनेच्या राडयात किरीट सोमय्या यांना दुखापत; संचेती रुग्णालयात केले दाखल

पुणे : पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमाय्यांची गाडी आडवली व त्यांना घेरले. यावेळी किरीट सोमय्या हे महापालिका इमारतीच्या पायरीवर कोसळले. अन् यामध्ये सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या हे पायरीवर खाली पडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सोमय्या यांना दुखापत झाली असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किरीट सोमय्या यांनी कोणते आरोप केले आहेत? 

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे ‘कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ या कंपनीला देण्यात आले होते. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापण कारणीभूत असून लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच कोविड सेंटरच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्यामुळे रूग्णांचे मृत्यू झाले. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस सुजित पाटकर यांची कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाला आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मालक सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आलं, असाही आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading