Wednesday, July 22, 2026
Latest NewsPUNE

नको बापट नको, टिळक पुणेकरांना पाहिजे नवी ओळख पुण्यात पुन्हा बॅनरबाजी

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. यानंतर एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात बॅनरबाजी सुरू केली आहे.भन्नाट पुणेरी पाट्या लावत विरोधक एकमेकांविरोधात बॅनरबाजी करत आहेत. पुणे महानगरपालिका निवडणूकीचे वारे आता खऱ्या अर्थाने वाहायला सुरवात झाली आहे.

पुण्यात चौका चौकात बॅनर लावलेले दिसत आहेत, नको बापट नको ,टिळक पुणेकरांना पाहिजे नवी ओळख, धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत… असे बॅनर लावून  विरोधक एकमेकांविरोधात बॅनरबाजी करत आहेत.
नगरसेवक धीरज घाटे यांनी नागरीकांच्या मदतीसाठी ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशा प्रकारचा फ्लेक्स लावला आहे. त्यावरच प्रतिउत्तर म्हणून त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत. ‘धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट – नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख’ अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये पुणेकरांना आता नवीन ओळख पाहिजे. असे बॅनर लावण्यात आले आहे. पुढे तुमचाच मतदार बंधू आणि भगिनी असंही लिहिण्यात आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading