Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुलाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कडून निषेध

पुणे:राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले.
हे निषेध आंदोलन पुण्यात संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळीबंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्या बदल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून निषेध करण्यात आला.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा सातपुते, पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक व पुणे शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या,दारुबाबत केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.तरीही त्यांनी आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे यांची मुले दारू पितात असे वक्त्यव केले आहे .ते एकदम चुकीचे आहे.बंडातात्या कराडकर हे कीर्तनकार आहेत.
त्यांनी एखादे वक्तव्य बोलताना विचार करावा. बंडातात्या कराड यांनी सुप्रिया सुळे याची माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही बंडातात्या कराड यांना शांत बसून देणार नाही. असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला
प्रशांत जगताप म्हणाले,कीर्तनकार हे काहीतरी वक्तव्य बोलून धोक्यात येत आहेत. आज आम्ही त्यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading