Sunday, November 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

अमिताभ बच्चन स्टारर व नागराज मुंजुळे दिगदर्शीत ‘झुंड’ चित्रपट मार्चमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित नागराज मुंजुळे दिगदर्शीत ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नागराजने स्वतः एक पोस्ट शेयर करीत ही माहिती दिली आहे. हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची मध्यवर्ती भूमिका असणार आहे.

विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना सोबत घेऊन त्यांनी आपला फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट  आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

 

Check this post from @taran_adarsh on Koo App:

“AMITABH BACHCHAN: ‘JHUND’ ARRIVES ON 4 MARCH 2022… #Jhund …”
https://www.kooapp.com/koo/taran_adarsh/b12b0eb9-fb4b-4570-b913-1434a496fe28

Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

Leave a Reply