Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

पुण्‍यातील आर्टिस्‍टचे कलाप्रेमींसाठी अद्वितीय ओपन स्‍टुडिओ कन्‍सेप्‍टचे प्रदर्शन

पुणे : रीना सोनी या मिक्‍स्‍ड मीडिया आर्टिस्‍टने नुकतेच पुणे शहरातील कलाप्रेमींसाठी यशस्‍वी ओपन स्‍टुडिओचे आयोजन केले. सामान्‍यत: युएसमध्‍ये दिसण्‍यात येणारी ही संकल्‍पना शहरासाठी अनोखी आहे. ही संकल्‍पना कलाप्रेमींना आर्टिस्‍टला भेटण्‍यासोबत तिच्‍याशी स्‍वत:च्‍या सर्जनशील क्षेत्राबाबत संवाद साधण्‍याची आणि वैशिष्‍ट्यपूर्ण, अद्वितीय कला पाहण्‍याची संधी देते.

कोरेगाव पार्क येथील तिच्‍या स्‍टुडिओमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या ३-दिवसीय ओपन स्‍टुडिओ इव्‍हेण्‍टला कलाप्रेमी, इंटीरिअर डिझाइनर्स, आर्किटेक्‍ट्स, गॅलरी ओनर्स आणि यांसारख्‍या इतर व्‍यक्‍तींनी भेट दिली आणि सादर करण्‍यात आलेल्‍या व्‍यापक कलाकृतीचे कौतुक केले.

३०० हून अधिक कलाकृतींमधील प्रत्‍येक कलाकृती अद्वितीय आहे आणि त्‍यामध्‍ये स्‍वत:ची कथा सामावलेली आहे. रीनाच्‍या कलाकृतीमध्‍ये प्रतिकात्‍मक मालिका ते निर्मल अमूर्ततेसह मानवी मनाच्‍या भावना व्‍यक्‍त करणा-या व मनाला स्‍पर्श करणा-या कार्याचा समावेश आहे. रीना सर्टिफाईड झेन्‍टँगल टीचर आहे. झेन्‍टँगल हा सर्व वयोगटांसाठी कलात्‍मक ध्‍यानाचा प्रकार आहे, जो अवधान व सर्जनशीलतेला चालना देण्‍यासोबत वैयक्तिक आरोग्‍य देखील वाढवतो.

बोस्‍टन येथील म्‍युझियम ऑफ फाइन आर्टस् येथे पुस्‍तके, वर्कशॉप्‍स, प्रिंट मेकिंग, तसेच पेन व इंकच्‍या माध्‍यमातून स्‍वयं-अध्‍ययनासह कलात्‍मक करिअरची सुरूवात केलेली रीना हसत म्‍हणाली, ”कलेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याची, आयुष्‍य प्रज्‍वलित करण्‍याची, शिक्षित, प्रेरित व प्रोत्‍साहित करण्‍याची क्षमता आहे.”

रीना आर्टिस्‍ट्सच्‍या सर्व स्‍तरांसाठी (पर्सनल, ग्रुप व कॉर्पोरेट) क्रिएटिव्‍ह वर्कशॉप्‍सचे आयोजन करते आणि तिची वेबसाइट www.reenasonistudio.com च्‍या माध्‍यमातून संपर्क साधता येऊ शकतो.    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading