Monday, November 2, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

हिंदुस्तानी भाऊला कडक शिक्षा करावी – रुपाली पाटील ठोंबरे

पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, असे शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. या विरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’ अर्थात विकास फाटक याच्या भडकाऊ व्हिडीओमुळे असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले व राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या अटकेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊला कडक शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरपूर झाले आहे.
त्यात अशा आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरत आहे. त्यामुळे या हिंदुस्तानी भाऊने सरकार व विद्यार्थ्यांची माफी मागावी, तसेच त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

Leave a Reply