Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खंडणी उकळ्या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथिल भाजप नगरसेवकाला अटक

पिंपरी-चिंचवड : मेट्रोकडून महापालिकेला देण्यात आलेले गाळे मिळवून देतो असे सांगून व्यापाऱ्यां कडून खंडणी उकळ्या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथे एका भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. केशव घोळवे असे अटक करण्यात आलेल्या नगरसेवकांचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केशव घोळवे हे पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोकडून 100 गाळे बांधून महापालिकेला दिले जात आहेत. महापालिकेकडून हे गाळे मिळवून देतो, असे गणेश घोळवे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. या गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांकडून केशळ घोळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला अनेकांनी प्रत्येकी 50 हजार रुपये दिले होते. त्यानंतर घोळवे यांनी पुन्हा प्रत्येकी एक लाखांची खंडणी मागितली केली, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका फिर्यादीने 55 हजार रुपये दिले होते, पुढचे एक लाख न दिल्यास जीवे मारण्यात येईल असं ही धमकावण्यात आले होते. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी घोळवेसह त्याच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading