ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक आणि खलनायक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका करणारा राजबिंडा नट अशी त्यांची ओळख होती. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव याचे ते पती. त्यांनी आतापर्यंत 285 पेक्षा जास्त हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
