fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

महानगरपालिका निवडणूकित आघाडी करायची की नाही याचा निर्णय शिवसेना नेते खासदार संजय राऊत घेतील – संजय मोरे

पुणे : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल,असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 173 जागा पैकी122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.तर मनसेनी या प्रभाग रचने विरुद्ध प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप करत आंदोलन केले आहे. त्यावर शिवसेनेने सावध भूमिका घेतली असून महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढण्यायाची की नाही यावर अजून निर्णय झालेला नाही. तसेच आघाडी करायची की नाही याचा निर्णय आमचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत निर्णय घेतील असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले.

संजय मोरे म्हणाले, प्रभागा मध्ये उमेदवार कसे लढवायाचे यांची आम्ही तयारी करणार आहोत. आमचे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे रविवार सोमवारी पुण्यात येत आहेत.ते पक्षाची रनरीती ठरवितिल असे संजय मोरे म्हणाले. पक्षाने केलेली कामे आम्ही या वेळी मांडणार आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading