Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

समाविष्ट गावांचे तुकडे केल्याने पुन्हा बकालीकरण;
अन्यायकारक प्रभाग रचनेविरुध्द न्यायालयात दाद मागणार –
श्रीरंग चव्हाण पाटील

पुणे : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या धायरी ,आंबेगाव ,नऱ्हे शिवणे, आदी समाविष्ट केलेल्या गावांचे तुकडे करून महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विकासा ऐवजी या गावात पुन्हा बकालीकरण येणार आहे. पालीकेच्या अन्यायकारक प्रभाग रचनेविरुध्द थेट न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार सर्वपक्षीय हवेली तालुका नागरि कृती समीतीने केला आहे.

या बाबत समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्यायकारक प्रभाग रचने विरोधात सर्व पक्षिय कार्यकत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

चव्हाण पाटील म्हणाले, चोहोबाजूंनी दाट लोकवस्त्या झालेल्या गावाच्या विकासासाठी समीतीने न्यायालयात यशस्वी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार शहरालगतच्या ३४ गावांचा दोन टप्प्यात महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यानंतर प्रथमच पालीकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. २०१७ मध्ये समावेश केलेल्या शहरा सभोवतालच्या ११ गावांसाठी एकच प्रभाग करून निवडणूक घेण्यात आली. त्याही पेक्षा भयानक परिस्थिती काल जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ३४ ,३५ ,५२ आदी च्या रचनेत आहे. शिवणे ,उत्तमनगर ,नऱ्हे, नांदेड, आंबेगाव बुद्रुक या गावांचे प्रभाग रचनेत तुकडे करण्यात आले आहे. सलग प्रभागात न करता अन्यायकारक विभाजन करण्यात आले आहे. खडकवासला धरणाखालील कोंढवे धावडे ,कोपरे गाव शेजारच्या उत्तमनगर ,शिवणे ला न जोडता दुर अंतरावरील वारजे हायवे पलीकडे जोडले आहे. अशीच गंभीर स्थिती नऱ्हे, नांदेड, धायरी आदी ठिकाणी आहे.

आंबेगाव खुर्द सरपंच अमर चिंधे ,आंबेगाव बुद्रुक चे संतोष ताठे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. समीतीचे सुभाष नाणेकर म्हणाले, शिवणे ,उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे ही गावे सलग आहेत. स्वातंत्र्यापासून लोकल बोर्ड, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही गावे एकाच गटात होती. आता मात्र पालीकेच्या निवडणूकीसाठी कोणत्याही हद्दी नसताना आधीमधीच गावाचे तुकडे केले आहेत. नांदेड ,खडकवासला, किरकटवाडी, धायरी ,नऱ्हे भागात असेच चित्र आहे. प्रस्थापियांच्या लाभासाठी तुकडे : या पुर्वी ही गावे जिल्हा परिषद तसेच तालुका पंचायत समिती निवडणुकीत सलगपणे एकमेकांना जोडली होती. त्याचा लाभ येथील कार्यकत्यांना झाला. आता मात्र पालीकेसाठी तीन नगरसेवकांचा एक प्रभाग झाला. त्यासाठी पन्नास हजारावर मतदार आहेत. २०१७ व २०२१ मध्ये पालीकेत समावेश करण्यात आलेली गावे सलगपणे एकमेकांना न जोडता त्यांचे प्रस्थापितांच्या लाभासाठी गावांचे तुकडे करण्यात आले आहेत असा आरोप चव्हाण पाटील यांनी केला आहे.

गावांचे विभाग करून प्रभाग रचना केल्याने राजकीय समीकरण बदलणार आहे. शिवणे, कोपरे , कोंढवे-धावडे, उत्तमनगर ,नांदेड, नऱ्हे, धायरी आदी गावांचे तुकडे केले आहेत. रस्त्याच्या एका बाजूला एक प्रभाग व दुसऱ्या बाजूला दुसरा प्रभाग केल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रभाग रचनेमुळे नागरि कुती समीती आक्रमक झाली आहे. समीतीने गावांचे विभाजन रद्द करून सलग प्रभागात समावेश न केल्यास थेट न्यायालयात दाद मागण्यांचा निर्धार केला आहे

Leave a Reply