आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 846 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 846 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5521 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 44 हजार 341 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 11हजार 350 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9261जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 24030 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 301 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 11129 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
