पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होतीये
आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 56 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून वाढ होत असलेली कोरोना रूग्ण संख्या आज कमी होताना दिसत आहे. पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 56 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3283 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 39 हजार 420 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 258 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 29917 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 336 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8383 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
