महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा; राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवलायं – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : 3 -4 दिवसांपूर्वी एक तर्फे प्रेमातून तळेगाव येथे एका मुलीवर काही जणांनी हल्ला करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राज्यात महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे. त्यावर त्या आरोपीला या आधी पोलिसांनी देखील समन्स दिली होती. त्या मुलीला पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे. आरोपीला कुठल्याच परिस्थितीत जामीन मिळू नये. राज्यात अश्या कुठल्या घटना घडू नये म्हणून शक्ती कायदा अमलात आणला असून तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती विधानसभेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
यांनी दिली. त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी जस मुंबईत निर्भया पथक सुरू केल आहे. तस राज्यभर करण्याचं काम सरकार करणार आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती का वाटत नाही याबाबत पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना अभ्यास करणे गरजेचे आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. महिलांना सुरक्षितता देता यावी म्हणून, मी राज्यातील सर्व पोलिसांना सतत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
