Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विरोधकांना टिका करण्याशिवाय दुसरे कोणते काम उरलेले नाही – शंभूराजे देसाई  

पुणे : विधानसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी नियमानुसारच बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.  आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय माध्यमातून समाजाला. त्या निर्णयाची प्रत विधानसभा अध्यक्षांकडे पाठवली जाईल. त्याचबरोबर विधीन्याय विभागाडे पाठवली जाईल. यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करेल. पण विरोधी पक्षाला टीका करण्याशिवाय कोणते काम उरलेले नाही, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपवर केली. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

आज बारा आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला फटका बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराजे देसाई बोलत होते.

काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावर शंभुराजे देसाई म्हणाले,शेतकऱ्यांच्या द्राक्ष्याला बाजारपेठ मिळावी,चांगला दर मिळावा हा आमचा वाईन सुपरमार्केटमधे उपलब्ध करुन देण्यामागे उद्देश आहे. शेतकरी हा या निर्णयामागचा केंद्रबिंदू आहे. असे शंभूराजे देसाई म्हणाले.

राज्यात वाळू तस्करी जोरात चालली आहे. त्याबाबत देसाई म्हणाले, वाळू तस्करीबाबात मी पोलीस अधिक्षकांशी फोनवरुन बोललो. पोलिसांनी मध्य प्रदेश बॉर्डरवर जाऊन कारवाई केली. पण पुढच्या कारवाईचे अधिकार महसुल विभागाला आहेत. मी नागपुरच्या पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे की, बरे झालात की  नागपुरच्या विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकाऱ्यांना भेटा. महसुल विभाग आणि पोलीस एकत्र येऊन जॉइन्ट ऑपरेशन करतील. मी महसुल मंत्र्याशी देखील याबाबत बोलणार आहे.

Leave a Reply