Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 4 हजार 136 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 4 हजार 136 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7410 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 24 हजार 684 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 57 लाख 42 हजार 97 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9214 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 41173 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 368 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 12816 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading