Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

भारतीय जनता पक्षाने दुसऱ्याच्या कर्तृत्वाचे श्रेय घेऊ नये – प्रशांत जगताप

पुणे ः- महानगरपालिका निवडणुका तोंडावर आले असतांना पायाखालची वाळू सरकतांना पाहून भारतीय जनता पक्ष दुस-यांनी केलेल्या विकासकामाचे देखील श्रेय घेऊ पाहत आहे. पंरतू नागरिक सुज्ञान असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला जागा दाखविल्यासिवाय राहणार नाही असे विचार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काढले.

लक्ष्मी दुधाने यांच्या पुढाकारातून आणि स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 31 मधील सर्वे नंबर 14 मधील जावळकर वस्ती येथील पुणे मनपाच्या 29 गुंठे आरक्षीत जागेवर प्रस्तावित असलेल्या अत्याअाधुनीक क्रिडा प्रशिक्षण क्रेंदाचे आज जगताप यांच्या हस्ते उद्घटान झाले त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने,नगरसेविका सायली वांजळे, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, ज्योती सुर्यवंशी,अश्विनी माने, हर्षवर्धन मानकर, सुक्ष्मा सातपुते आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारीउपस्थित होते.

प्रशांत जगताप त्यांच्या मनोगतात म्हणाले, भारतीय जनता पक्षाने पुण्यातील मोक्याच्या जागा 99 वर्षांच्या करारावर देऊन सरळ सरळ विकायला काढल्या होत्या, पंरतू राष्ट्रवादी पक्ष मनपात निभावत असलेल्या विरोधी पक्षाच्या जागृक भुमिकेमुळे भाजपाचा हा डाव आम्ही हाणून पाडला.सत्तेत असतांना विकास काम न करता केवळ टक्केवारीचे राजकारण आजवर पुणे मनपातील सत्ताधीरी भाजपने केले . राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते काही विकास काम करु पाहत आहेत तर त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यापासून त्या विकास कामांमध्ये विघ्न आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. लक्ष्मी दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी राबवलेल्या विकास कामां इतके प्रकल्प भाजपने
दाखवून द्यावे असे आवाहन ही जगताप यांनी यावेळी केले.

स्वप्नील दुधाने यावेळी स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाले, पुणे महानगरपालिका यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा करुन रितसर कायदेशिर प्रक्रियेद्वारे हा भूखंड हस्तांतरीत करुन घेण्यात आला असून या 29 गुंठे च्या प्लाॅटवर क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. कर्वेनगरच नव्हे तर कोथरुड भागात ही इतके अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र नसेल असे केंद्र येथे उभारण्यात येणार आहे. मातीचे मैदान, तायक्वांदो, कराटे, अॅरोबिक्स, योगा, जिम्नॅशियम, कुस्ती, खेळाडू करिता समुपदेशन सभागृह आदी सेवा सुविधांनी हे क्रीडा प्रशिक्षण केंद्र परिपूर्ण असेल. या भागात होत असलेले विकास काम भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक आणि नेतृत्वाला बघवत नसल्याने विकासकामांत खोडे घालून अडथळ्यांचे राजकारण केले जात आहे. ह्या खालच्या प्रतीच्या राजकारणावर आम्ही मात करुन विकासकामांचा धडाका सरुच ठेवणार आहोत. कारण आमची बांधिलकी नागरीकांशी आणि पक्षाशी आणि आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास आणि सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे हे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग मानतो. विकास काम ही शेवटे जनतेच्या पैशातून उभे राहत असून भारतीय जनता पक्षाच्या मनपाच्या बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करीत आहे.

पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply