युवराज सिंगच्या घरी ‘ज्युनियर युवी’चे आगमन
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी ‘ज्युनियर युवी’चे आगमन झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि.25) युवराज सिंग आणि त्यांची पत्नी हेजल कीच यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. युवराज सिंगने स्वतः ट्वीट करून ही आनंदाची बातमी दिली आहे.
यामध्ये युवराजने लिहिले आहे की, ‘आम्हाला आमच्या कुटुंबियांना, मित्र-मैत्रिणींना आणि चाहत्यांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, देवाच्या कृपेने मला आणि हेजलला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. आम्ही सर्वांकडून आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल, याची अपेक्षा करतो. आम्ही या आनंदी क्षणासाठी देवाचे आभार मानतो.’
युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा 30 नोव्हेंबर 2016 रोजी विवाह झाला होता. हेजल कीच हीने अभिनेत्री असून अनेक जाहिराती आणि सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.
❤️ @hazelkeech pic.twitter.com/IK6BnOgfBe
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) January 25, 2022
