जमीन लाटण्यासाठी भाजप आमदाराने केली विधानसभेची दिशाभूल ; सचिन तावरे यांचा गंभीर आरोप
पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी धनकवडी येथील एका जमिनी बाबत खोटे आरोप करत, धमकावत जागा बळकावण्याचा प्रयत्न केला तसेच याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि राज्याच्या विधानसभेची दिशाभूल करत खोटे प्रश्न उपस्थित केल्याचा खळबळजनक आरोप सचिन तावरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
याविषयी बोलताना सचिन तावरे म्हणाले की, विधानसभा सदनाची दिशाभूल करून माझ्या व सिकंदरसिंग ईश्वरसिंग दुधानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत, धनकवडी , पुणे येथे जमीन मिळकत सव्र्व्हे नंबर ३७/७ व ३७/१४ मध्ये एकूण २५.३ ९ आर इतकी मिळकत तिच्या पूर्वीच्या मालकाकडून कायदेशीररीत्या दि . १५/०७/२०१७ रोजी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र .४५३० / २०१७ व ४५३३/२०१७ नुसार खरेदी घेतलेली आहे . खरेदी घेण्यापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली होती तसेच वकिलांकडून शोध अहवाल घेतल्यानंतर सदरी मिळकत खरेदी घेतलेली होती . त्यानुसार सदर मिळकतीचा ७/१२ उताऱ्यास तावरे व दुधानी यांच्या नावाची नोंद झालेली आहे .
सदरची मिळकत ही आमदार भीमराव तापकीर यांचे घरापासून साधारण ५०० मीटरच्या आसपास आहे . सदरची मिळकत ही भीमराव तापकीर यांना त्यांचे घरासाठी हवी होते , असे आम्हाला नुकतेच कळालेलं आहे , परंतु सदरची मिळकत ही मूळ मालकांकडून आम्ही खरेदी घेतल्याने त्याचा द्वेष त्यांचे मनात निर्माण झाला आहे . त्यामुळे ना त्या कारणाने आम्हाला जाणूनबुजून त्रास देऊन आमची मिळकत बेकायदेशीर रीत्या मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे आम्हाला जाणवले आहे .
सदर मिळकतीला असलेले आमचे तारेचे कंपाउंड तोडून टाकलेमुळे व तसेच आम्हाला सदर मिळकतीला पत्र्याचे कंपाउंड करण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळा करून खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी देत असल्यामुळे आम्ही दि . २६/०६/२०२१ रोजी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर यांच्याकडे भीमराव धोंडिबा तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था यांचेविरुद्ध रीतसर तक्रारी अर्ज दाखल केलेला होता . दरम्यान सदर भीमराव तापकीर आमच्या मिळकतीवर बेकायदेशीररित्या कब्जा करणार असल्याचे आम्हाला कळाल्याने आम्ही दि . ११/०७/२०२१ रोजी आमच्या मिळकतीचे संरक्षण करणेकामी पत्र्याचे कंपाउंड केले . त्यावेळेस सदर कंपाउंडचे काम करत असताना आमदार भीमराव तापकीर यांचे चिरंजीव रोहन भीमराव तापकीर यांनी आमचे काम थांबविण्याचा प्रयत्न करून आमच्याच विरुद्ध खोटी पोलीस तक्रार दाखल केलेली होती . तदनंतर आमदार भीमराव तापकीर , त्यांचा मुलगा रोहन तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था हे आमच्या मिळकतीमधील ताबे वहिवाटीस अडथळा निर्माण करत असल्याने आम्ही पुणे येथील दिवाणी न्यायालययात रे.मू.न .१२४२ / २०२१ असा दावा दाखल केलेला आहे . सदर दाव्यामध्ये दि . १०/०८/२०२१ रोजी मा.न्यायालयाने सदर मिळकतीवरील आमच्या ताब्या संदर्भातील फोटोग्राफ्स , कागदपत्रे याची पाहणी करून जागेवर ‘ जैसे थे ‘ परिस्थिती ठेवण्याबाबतचा आदेश आमदार भीमराव तापकीर , रोहन तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था यांच्याविरुद्ध कोर्टाने पारित केलेला होता . सदरचा कोर्टाचा आदेश हा आजतागायत अस्तित्वात आहे .
सदर दाव्यामध्ये भीमराव तापकीर व त्यांचा मुलगा रोहन तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था हे हजर होऊन त्यांनी त्यांची बाजू दिवाणी न्यायालयात मांडलेली आहे . सबब सदरचा वाद हा दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे . दरम्यान आमच्या जागेवरील पत्र्याचे कंपाउंड तोडून सदरचे साहित्य चोरून नेऊन तसेच दिवाणी न्यायालयाचे ‘ जैसे थे ‘ आदेशाचा अवमान केला म्हणून आम्ही दिवाणी कोर्टात आमदार भीमराव तापकीर व त्यांचे साथीदारांच्या कोर्टाच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांचे विरुद्ध अवमान याचिका देखील दाखल केलेली आहे . आम्ही दि .२० / १० / २०२१ रोजी सहकार नगर पोलीस स्टेशन येथे आमदार भीमराव तापकीर व त्यांचे साथीदारांचे विरुद्ध लेखी तक्रार दिलेली आहे . परंतु ते आमदार असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध २ तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही . 4 ) मा . दिवाणी न्यायालयाने दि . ०२/१२/२०२१ रोजी कोर्ट कमिशनर म्हणून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची नियुक्ती करण्याचा आदेश करून त्यांना सदर मिळकती संदर्भात सरकारी मोजणी करण्याचे आदेश देऊन कोर्टास अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे . त्याप्रमाणे आम्ही मोजणीचे चलन रक्कम रु .४२,००० इतके शासनास भरलेली आहे . अशी एकंदरीत सदर मिळकती संदर्भात आमचे व भीमराव तापकीर यांचे दिवाणी स्वरूपाचे बाद न्यायालयात चालू आहेत. मा . उच्च व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी असे अधोरेखित केलेले आहे की , मंजूर ले आऊटमधील सोसायटीमधील मोकळ्या जागेचे हस्तांतरण कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही , असे असताना देखील सोसायटीच्या मोकळ्या जागेचा करारनामा करून मा . आमदार साहेब हे सदरचा करारनाम्याच्या आधारे आमच्या मिळकतीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे .
आमदार भीमराव तापकीर साहेब यांनी सन २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नामनिर्देशन पत्र भरताना नामनिर्देशन पत्रात सदर मिळकतीचा ( २२ आर क्षेत्राच्या ) कोणताही उल्लेख केलेला नाही . सन २०१ ९ रोजीचा विधानसभा निवडणूक वेळी नामनिर्देशन अर्ज भरताना दि . ११/०३/२०१० रोजीचे विकसनासाठी घेतलेल्या मिळकतीचा उल्लेख खरेदीची मिळकत अशी दाखवून तसेच सदर सोसायटीच्या एकूण मिळकतीचा सर्व्हे नंबर नमूद न करता फक्त १ मोगम सर्व्हे नंबर नमूद करून निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे . अशी एकंदरीत परिस्थिती असताना दि .२७ / १२ / २०२१ रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी भीमराव अण्णा तापकीर यांच्या वर्षानुवर्षाच्या २० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या घराच्या शेजारील मिळकती मध्ये एका रात्रीत पोलिसांच्या मदतीने गुंडांनी ताबा केला असा प्रश्न उपस्थित केला .
हिवाळी अधिवेशनामध्ये मा . विरोधीपक्ष नेते देवेन्द्रजी फडणवीस यांनी भीमराव तापकीर यांच्या open space संदर्भातील विकसन करारनाम्याचे कागदपत्रांचे अवलोकन केले असते तर हिवाळी अधिवेशनामध्ये सदरचा मुद्दा उपस्थित केला नसता . या सर्व पार्श्वभूमीवर भीमराव तापकीर व त्यांचा मुलगा रोहन तापकीर यांच्या दबावाखाली आमच्यावर कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून आम्ही मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे . असेही सचिन तावरे यांनी सांगितले.
