Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

वारजे, पाषाण भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे : येत्या गुरुवारी (दि. 27) वारजे जलकेंद्र, खडकवासला (रॉ वॉटर)केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विषयक कामे करावयाचे असल्यामुळे त्या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र व नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहराच्या पश्चिम भागात पाणी बंद असणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
(वारजे जलकेंद्र) : भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर,रामनगर,करोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर इ. व नवीन होळकर जलकेंद्राकडील कळस, धानोरी, विमाननगर,लोहगाव पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटिल इस्टेट,भांडारकर रोड.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading