पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आज दिवसभरात 7 हजार 264 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 7 हजार 264नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4575रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 83हजार 533 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5लाख 32हजार 101इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 7पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9168जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 42264रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 282रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 20342स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
