सीमा सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सीमा सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती जाहीर केली आहे.
सीमा सावंत यांनी पुणे जिल्हा काँग्रेस महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांसाठी अनेक राजकीय आणि सामाजिक कार्य करीत आहेत साडेसतरा नळी हडपसर येथील या विभागात कार्य करतात तसेच पुणे जिल्हा,व तालुका पातळीवर महिला काॅंग्रेसच काम केले आहे सीमा सावंत या राजकीय व सामाजिक कार्य आणि क्रिडा क्षेत्रात कार्यरत आहेत.सीमा सावंत या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे त्यांनी कुस्ती मधे एन. आय. एस. गुजरात येथे केले असून खडतर परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय कुराश कुस्ती या खेळात साऊथ कोरियामधील स्पर्धेत तिसरा क्रमांकाचे पदक मिळविले आहे तसेच ज्यूदो आणि कराटे या खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. त्यांना अनेक बक्षिसे आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी करताना राजकारणात काम करत आहेत.अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यिनींना स्वसंरक्षणासाठी ज्यूदो आणि कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित करतात सीमा सावंत यांच्या नवनियुक्तीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांसाठी काम करत राहीन असे मनोगत सीमा सावंत यांनी व्यक्त केले.
