पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांची वकिलांच्या ग्राहक सोसायटीला भेट
पुणे : शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालयात असलेल्या ग्राहक सोसायटीला अचानक पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब यांनी सदिच्छा भेट दिली असता ग्राहक सोसायटीचे चेअरमन ऍड. दादा शेटे आणि मा. उप चेअरमन ऍड. फैयाज शेख यांच्या हस्ते नवीन वर्षाची डायरी भेट म्हणून देण्यात आली.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी संपूर्ण सोसायटीची पाहणी केली तसेच ग्राहक सोसायटीचे चेअरमन यांचा वाढदिवस असल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी चेअरमन यांना तिळाची वडी मुखात भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी मा. निवृत्ती न्यायाधीश निकम साहेब,ग्राहक सोसायटीचे सेक्रेटरी ऍड. निवेदिता काळे,कोर्ट मॅनेजर अतुल झेंडे,मा. चेअरमन ऍड. संदीप सावंत, मा पुणे बारचे अध्यक्ष ऍड. अशोक सपकाळ, नोटरी ऍड. सुनील सोनावणे, ऍड नाथा शिंगाडे, ऍड.दिग्विजय पालांडे, ऍड विष्णू तापकीर इत्यादी उपस्थित होते.
