येत्या विकेंडला राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवला. पण त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामानाची नोंद झाली आहे. येत्या विकेंडला राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

पुढील दोन दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसांत कोकणासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवणार आहे. त्यानंतर मात्र संबंधित परिसरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: