पुणे मेट्रोला शरद पवार यांची ‘सरप्राइज विजिट’
पिंपरी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा पुणे मेट्रो प्रवास आज केला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची नव्हती. ऐनवेळी सकाळी पुणे मेट्रोला शरद पवार यांची ‘सरप्राइज विजिट’ दिली असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून पुणे मेट्रोची सविस्तर माहिती घेतली.
पिंपरीतील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. याची पहाणी करण्यासाठी आज शरद पवार यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुगेवाडी येथील पुणे मेट्रो स्थानकाला अचानक भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा पुणे मेट्रो प्रवास केला. दरम्यान, पुणे मेट्रोला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी कोणालाच दिली नव्हती.
संबंधीत बातमी –
पुणे मेट्रो कंपनी विरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव आणणार – चंद्रकांत पाटील https://maharashtralokmanch.com/2022/01/17/pune-metro-company-will-bring-a-motion-for-violation-of-rights-chandrakant-patil/
