Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 375 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 5 हजार 375 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3090 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 59 हजार 549 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 16 हजार 221 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 5 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 34187 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 208 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 19119 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading