fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे कँटोनमेंट बोर्डाच्या कचरा प्रकल्प निधी वर्ग करण्याच्या प्रस्तावावर आपने उपस्थित केले प्रश्न 

पुणे : पुणे महापालिका ही पुणे कँटोनमेंट बोर्डाच्या कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी निधी वर्ग करणार आहे. ही प्रक्रिया पाहाता कचरामुक्त पुण्याऐवजी निधीमुक्त पालिका करण्यासाठीच सदर प्रक्रिया राबवली जात आहे हे उघड आहे. अर्थातच ही सर्व प्रक्रिया राबवणारे कलावंत अगदी जुने जाणते आणि अनुभवी असल्याने त्यांना पालिकेचा पैसा आपल्या खिशात कसा वर्ग करायचा याचा दांडगा अनुभव आहे. पालिकेतील पूर्वीचे सत्ताधारीही पैसा खायचे परंतू ते चमच्याने खात होते. विद्यमान सत्ताधा-यांनी संपूर्ण पातेलं तोंडाला लावलं आहे,” अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

कँटोमेंट बोर्डाला पुण्याच्या कचरा प्रक्रियेसाठी निधी वर्ग करण्याचा ठराव उद्या सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी येणार आहे.

या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत-

१. मुळात पुण्याचा कचरा पुणे कँटोन्मेंटच्या प्रकल्पात पाठवण्याची गरज काय आणि ते कोणत्या कायद्यानुसार बसतं? पालिकेचा निधी असा वर्ग केला जाऊ शकत नाही.

२. पुणे कँटोन्मेंटच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प किती क्षमतेचा आहे याचा उल्लेख विषयपत्रात नाही. क्षमतेमध्ये किती वाढ होणार याचा स्पष्ट उल्लेख नाही.

३. पुणे कँटोन्मेंटच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प ५० मेट्रीक टन क्षमतेचा आहे असे म्हटले जाते. त्याची क्षमता १०० मेट्रिक टन करणार की १५० मे. टन करणार याचा स्पष्ट उल्लेख नाही.

४. निविदा कशाप्रकारे राबवणार याचा उल्लेख विषय पत्रात उल्लेख नाही.

५. पूर्वीचा कॅन्टोन्मेंटचा ठेकेदार म्हणजेच भूमी ग्रीन एनर्जी हा कॅन्टोन्मेंट कचरा प्रक्रिया २७७ रुपये प्रति टन या दराने करत आहे. तर पुणे महापालिका ४०२ रुपये प्रती मेट्रिक टन अधिक प्रशासकीय शुल्क खर्च असा एकूण ४४३ रुपये प्रति मेट्रिक टन अधिक विद्युत बिल देयक इतका खर्च का करत आहे?

६. प्रशासकीय शुल्क १०% देण्यात येणार आहे. हे प्रशासकीय शुल्क म्हणजे नेमके काय?

७. जर एक ठेकेदार एका ठिकाणी म्हणजे कँटोनमेंट बोर्डामध्ये २७७ रुपये मेट्रिक टन या दराने कचरा प्रक्रिया राबवत असेल तर त्याच ठिकाणी ४४३ रुपये प्रति मेट्रिक टन अधिक विद्युत बिल देयक इतका खर्च पुणे महानगरपालिका का देत आहे?

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading