‘ओपन डेटा वीक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

पिंपरी चिंचवड महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

पुणे: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरातील ‘स्मार्ट सिटी’ मध्ये ‘ओपन डेटा वीक’ साजरा करण्यात येत करण्यात असून त्याअंतर्गत स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तरित्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

या निमित्ताने १७ ते २१ जानेवारी २०२२ पर्यंत गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयामार्फत १०० स्मार्ट शहरांमध्ये ओपन डेटा सप्ताह आयोजित केला जाईल. शहरी प्रशासन, डेटा व्यवस्थापन आणि डेटा व्यवस्थापनासाठी खुल्या डेटाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महानगरपालिका सेवांसाठी खुल्या डेटाचा वापर आणि विद्यार्थी, नागरिक, उद्योग यांना संशोधन, शिक्षण आणि नियोजनासाठी सहकार्य करणे हाही यामागचा उद्देश आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन डेटाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ ही मोहीम राबविण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना सहभागी होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहे. नागरिक तसेच संस्था १३ जानेवारी ते १८ जानेवारी २०२२ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. ब्लॉग लेखन, लेख आणि कथा लेखन, व्हिडिओ कथा स्पर्धांमध्ये ऑनलाइन सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ऍप्लिकेशनचाही वापर केला जाऊ शकतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इंक्युबेशन आणि लिंकेजेस केंद्राने आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेसोबत अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये विविध स्टार्टअप विषयक स्पर्धा तसेच विविध अभ्यासक्रमही तयार केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महापालिकेच्या स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज च्या आयोजनामध्येही संयुक्तपणे सहभागी आहे.

यानिमित्ताने २१ जानेवारी २०२२ रोजी डेटा हॅकाथॉन, पॅनेल चर्चा, तज्ज्ञांशी चर्चा आणि वेबिनारचेही आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे संपूर्ण तपशील तसेच अटी व शर्ती PCMC स्मार्ट सारथी अॅपवर उपलब्ध आहेत. तसेच https://pcmcsmartsarathi.org या वेबसाइटवर व pcmcsmartsarathi.org या संकेतस्थळावरही संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.या उपक्रम व स्पर्धेचे आयोजन कोविड -१९ च्या सरकारी अधिसूचना विचारात घेऊन केले गेले आहेत आणि त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या उपक्रम व स्पर्धेचे आयोजन कोविड -१९ च्या सरकारी अधिसूचना विचारात घेऊन केले गेले आहेत आणि त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: