Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – बुधवारी 4 हजार  857 नवीन कोरोना रुग्ण

पुणे:पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 4 हजार 857नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1805रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 37हजार 418 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5लाख  057हजार 084इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9131जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 22503रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 162रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 20801स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading