Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय या पूर्वीच राज्यसरकारने घेतला होता. मात्र याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. या नवीन सुधारीत निर्णयानुसार मराठी अक्षर ही इंग्लिश अक्षरांपेक्षा कमी आकारात लिहिता येणार नाही.

आज मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल. सुधारीत नियमानुसार खालील बाबी दुकानदारांवर बंधनकारक असणार आहेत –

– नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.  परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे.

– देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील

– मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.

– कामगार संख्या 10 पेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या दुकानांना व आस्थापनांना हे नियम बांधकारक असणार आहेत.

–  मदयविक्री दुकानांना महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत

 

 

 

Leave a Reply