Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Rain Alert : विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि थंडी यांची ये जा सुरू आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात काल पासून थंडी जाणवू लागली आहे. मात्र विदर्भात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 14 जानेवारी अर्थात संक्रातीपर्यंत विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच माराठवाड्यातही काही भागात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.  दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे खूप नुकसान केले आहे.

Leave a Reply