Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस गाड्या उचलण्याची मोहिम

पुणे:शहरातील लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने धुळ खात पडून आहेत. रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमुळे व खड्ड्यांमुळे त्रस्त असणार्‍या वहानचालकांना धुळ खात पडलेल्या वाहनांचाही अडथळा सहन करावा लागत आहे.
शहरातील रस्त्यावर जागोजागी समान पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. याशिवाय पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे अद्यापही दुरुस्त करण्यात आले नाहीत. काम केलेल्या ठिकाणी योग्य प्रकारे रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना आणि वहानचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही परिस्थीती केव्हा संपणार यावर महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी तारखांवर तारखा देत आहेत.

अशातच शहरातील लहान मोठ्या रस्त्यावर महिनोन महिने आणि वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात वाहने धुळ खात उभी आहेत. यातील अनेक वाहने बेवारस स्वरुपात पडून आहेत. या गाड्याचे मालक शोधण्याचे आवाहन वाहतुक पोलिस आणि महापालिका प्रशासनासमोर आहे. शहरात जवळपास 5 हजार वाहने अशा प्रकारे बेवारसपणे रस्त्याच्या कडेला पडून आहेत. खोदाईची कामे आणि खड्डांचा सामना करणार्‍या वाहनचालकांना या बेवारस व धुळ खात पडलेल्या वाहनांचाही सामना करावा लागत आहे. या वाहनाच्या अडथळ्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत असून या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहनांवर चिकटवल्या नोटीस ः
पालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत बेवारस वाहनांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. गेल्या महिनाभरात 677 गाडी मालकांना नोटीस देऊन 7 दिवसाची मुदत देण्यात अली आहे. तर गेल्या महिना भरात 104 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. धूळ खात पडलेल्या व बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे. याशिवाय या कारवाईसाठी मुख्य खात्याने 5 ट्रक, तीन क्रेन व मनुष्यबळ तैनात केले आहे.

  • माधव जगताप, विभागप्रमुख, अतिक्रमन विभाग, महापालिका

Leave a Reply