Thursday, September 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

नेहाला मनवण्यात यश होईल का यशस्वी?

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मालिका सध्या एका रंजक वळणावर आली असून प्रेक्षकांनी पाहिलं कि यशची खरी ओळख आता सगळ्यांसमोर आली आहे. यशाने त्याची खरी ओळख लपवून ठेवल्यामुळे नेहा खूपच दुखावली आहे. पण दुसरीकडे यश नेहाला मनवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. नेहा त्याच्यासाठी टिफिन आणेल असा विश्वास यशला असतो पण ती त्याच्यासाठी टिफिन आणत नाही आणि स्वतःही जेवत नाही. यशला विश्वास वाटतो की अजूनही ती आपला विचार करते. तो तिला लिफ्टमध्ये गाठून बोलायचा प्रयत्न करतो पण तिथेही बोलणं होत नाही. यशाची कॅम्पेन यशस्वी झाल्यामुळे सिम्मी सगळ्या ऑफिस स्टाफसाठी पार्टी अनाऊन्स करते. यश समीरवर जबाबदारी सोपवतो की काहीही झालं तरी नेहा पार्टीला आली पाहिजे. या पार्टीत सिम्मी यशासाठी काही नवीन अडचण निर्माण करणार का? यश नेहाशी पार्टीत बोलून तिला मनवू शकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading