Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही 500 चौ. फू. पर्यंतच्या निवासी मिळकतींना कर माफी द्यावी – अश्‍विनी कदम

पुणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शहरातील 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना कर माफी करण्यात यावी, असा ठराव स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्‍विनी कदम आणि नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी हा ठराव दिला असून येत्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेने नुकतेच 500 चौरस फूटा पर्यंतच्या घरांना करमाफ केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिकांकडून अशा प्रकारचे ठराव करण्यात येत आहेत. पुण्यातही अशा लहान मिळकती असून हा निर्णय झाल्यास या मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळ्णार आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना कर माफी करण्यात यावी असा ठराव कदम आणि दुधाने यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading