Friday, September 18, 2026
Latest NewsPUNE

श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्थेच्या या वर्षीच्या नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते वसंतशेठ बागमार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री शिवराय पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महिला सबलकरणासाठी पतसंस्थेकडून महिला बचत गटातील महिलांना व्यावसायासाठी सुलभ कर्ज योजना सुरू केली आहे.या प्रसंगी मुस्लिम बँकेवर नव्याने संचालक म्हणून निवडून आलेले माजी नगरसेवक ऍड. आयुब शेख, व समीर शेख यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अरुण वाघमारे,अध्यक्ष वसंत बराटे,बापू कांबळे,इकबाल सय्यद ,सुहास राजगुरू,प्रकाश बर्गे ,दिनकर मोहिते,राजाराम देवकर ,सौ.वृषाली वाघमारे,निता चव्हाण ,दिपाली थोरे,रमेश कांबळे ,नंदू लांडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading