मायक्रोफायनान्स उद्योग: पाणी व स्वच्छतेच्या समस्या सोडवून ग्राहकांचे सक्षमीकरण करत आहे
पुणे : जागतिक आरोग्य संघटना/युनिसेफ यांच्या संयुक्त देखरेख कार्यक्रमाने (जेएमपी) प्रसिद्ध केलेल्या अगदी अलीकडील अहवालानुसार, जगभरात ७८५ दशलक्ष लोकांना मुलभूत पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही . याशिवाय, २ अब्ज लोकांना- ३ पैकी १- शौचालये उपलब्ध नाहीत. पाणी व स्वच्छता यांच्या शाश्वत उपलब्धतेची तसेच व्यवस्थापनाची निश्चिती करणाऱ्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक ६ मध्ये, जागतिक राजकीय अजेंडावर पाणी व स्वच्छतेच्या मुद्दयांवर अधिक लक्ष दिले जात आहे, असे दिसून येते.
भारतात १.३८ अब्ज लोकसंख्येपैकी २२९ दशलक्ष नागरिकांना सुधारित स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत, ते उघड्यावर शौचाला बसतात आणि पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांना हातभार लावतात. ही समस्या हाताळण्यातील मायक्रोफायनान्स उद्योगाची भूमिका म्हणूनच लक्षणीय आहे. मायक्रोफायनान्स उद्योग वित्तपुरवठ्यातील त्रुटी भरून काढत आहे आणि सामाजिक उतरंडीच्या तळाशी असलेल्या लोकांना तारणमुक्त सुलभ कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हा उद्योग वॉश (डब्ल्यूएएसएच) कर्जांना प्रोत्साहन देत आहे, कारण ग्रामीण परिसंस्थेच्या सामाजिक-आर्थिक विकासात व स्थैर्यात पाण्याची टंचाई हा मोठा अडथळा आहे. याशिवाय, घरांच्या आवारांमध्येच सुरक्षित पाणी व सुधारित स्वच्छतागृहे उपलब्ध झाली, तर नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि हा निम्न उत्पन्न गटातील कुटुंबे हा वेळ उत्पन्न मिळवण्यासाठी उपयोगात आणू शकतील.
एमएफआयएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. अलोक मिस्रा म्हणाले की वॉश कर्जे ही एसडीजी जागतिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यातील एक खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि उद्योग या कार्याप्रती बांधील आहे. शाश्वत उपजीविकेची निश्चिती करण्याच्या उद्दिष्टासह हा उद्योग Water.org सारख्या संस्थांशी सहयोग करत आहे. यामुळे संसाधने, तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण तसेच परवडण्याजोगा वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी सहाय्य पुरवले जाते. निम्न-उत्पन्न कुटुंबांना त्यांच्या आवश्यकतेनुसार, हाउस वॉटर कनेक्शन/पाइप्ड वॉटर, बोअरवेल किंवा हॅण्डपम्प, रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग, न्यू टॉयलेट (सेप्टिक/पिट), वॉटर अँड सॅनिटेशन कॉम्बिनेशन अशा अनेक प्रवर्गांखाली, पाणी व स्वच्छता कर्जे पुरवली जातात. सुरक्षित पाणी व वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध झाल्यास, ग्राहकांना वाढीव उत्पादनक्षमता वाढीव उत्पन्न व वाढीव वेळ हे लाभ मिळू शकतील.”
