बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे शहर व जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड संदीप ताजने व प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक झाली .यामध्ये पुणे मनपा ,पिंपरी चिंचवड मनपा व इतर सर्व निवडणुकीवर चर्चा झाली तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वं कार्यकारणी रद्द करण्यात आली व पुणे जिल्हाध्यक्ष पदी हुलगेश चलवादी यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली.
प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड , प्रदेश सचिव भाऊ शिंदे व हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारणी तयार करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष ताजने व प्रभारी रैना यांनी दिले तसेच 2022 मधील सर्व निवडणुका हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असेही त्यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महेश कांबळे ,सांगली जिल्हा अध्यक्ष लहरिदास कांबळे , ओबीसी नेते बापू कुदळे , जिल्हा प्रभारी रमेश आप्पा गायकवाड ,शहर प्रभारी मोहमद शफी ,सागर खंडे ,पिंपरी चिंचवड अध्यक्ष सूरज गायकवाड ,अशोक गायकवाड ,कमलेश ओव्हाळ ,जाधव ताई व पुणे , पिंपरी चिंचवड मनपा व सर्व मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
