Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

पुणेकर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मोफत द्यावे – बालाजी पवार

पुणे : मुंबईच्या महानगरपालिका 500 स्क्वेर फूट फ्लॅट ची कर आकारणी माफ केली त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीतील 500 स्क्वेर फूट फ्लॅटची कर आकारणी रद्द करावी, पुणे महानगरपालिकका हद्दीतील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी कोणतीही कर आकारणी न करता मिळाले पाहिजे.  पुणे शहरात वाढता कोरोना व ओमोक्रोन फैलाव रोखण्यासाठी त्वरित पुणे शहरात यंत्रणा सज्ज करून द्यावी अन्न ,धान्य ,औषधोपचार जीवनावश्यक वस्तूंचे महापालिका तर्फे मोफत वाटप करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महापौर,जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदन देण्यात आली आहेत अशी माहिती उपाध्यक्ष बालाजी दादा पवार यांनी यावेळी दिली. 
यावेळी जिल्हा अध्यक्ष आप्पा सुतार ,उपाध्यक्ष बालाजी पवार ,महिला उपाध्यक्षा सुनीता किरवे ,शोभा साळुंके ,नयन चव्हाण ,श्रद्धा कदम ,वैशाली जाधव उपस्थित होते

Leave a Reply